महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने जानेवारी २०१९ पासून ते मार्च पहिला सप्ताह पर्यंत राज्यभर राबविण्यात आलेले चलो पंचायत अभियान जे शहरी भागांत चलो वार्ड या नावाने राबविले गेले यामध्ये पिपंरी चिंचवड शहर युवक काँग्रेस ने शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानासाठी उत्तम कामगिरी करत शहरात ५५ दिवसात ८० संवाद कार्यक्रम घेत सुमारे १०,५११ युवा शक्ती कार्डस् ची नोंदणी करत “विशेष कार्यरत जिल्हा सन्मान” मिळवित राज्य युवक काँग्रेस स्तरावर पिंपरी चिंचवड शहराचे नाव झळकावले आहे.
चलो वार्ड अभियानाच्या माध्यमातून युवक कॉंग्रेस पाच कलमी कार्यक्रम राबवीत आहे यांत बेरोजगारांना भत्ता, स्वंयरोजगार कार्यालयांचे सक्षमीकरण, महिला वसतीगृहांची निर्मिती,अल्प व्याज दराने शैक्षणिक कर्ज व बीनव्याजी व विनातारण व्यावसायिक कर्ज असा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. वाड्यावस्त्यावर जाऊन युवक कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये याबाबत जनजागरण करत युवाशक्ती कार्ड नोंदणी द्वारे पिंपरीत ६३९० भोसरीत ३००३ व चिंचवड मतदारसंघात १११८ ऐवढी व एकूण शहरातून सुमारे १०,५११ नोंदणी केली.
दि. १४ मार्च २०१९ रोजी दु. २ वाजता सिडको प्रदर्शन केंद्र , वाशी, नवी मुंबई येथे प्रदेश युवक काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत राज्यपातळीवर या अभियानाद्वारे ५ उत्तम जिल्हे निवडले गेले व त्याहून वेगळा एकच सन्मान “विशेष कार्यरत जिल्हा” म्हणून पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचा टीमसह प्रमाणपत्र देऊन सन्मान युवक काँग्रेस चे राष्ट्रीय प्रभारी व अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू, राज्य प्रभारी व युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रतिभा रघुवंशी यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरात कुठलाही लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला न मिळताही, कुठेही सत्तेवर नसताना, कोणतेही मोठे पाठबळ नसताना मोठ्या प्रमाणात केलेल्या या कामामुळे पिं. चिं.युवक काँगेसचा “विशेष कार्यरत जिल्हा” म्हणून सन्मान वरिष्ठ नेतृत्वाकडून झाला आहे. केवळ सक्रीय व प्रामाणिकपणे “कष्टाने काम करणा-या सहकार्यांच्या जोरावरच हे यश मिळविल्याचे “ युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
या प्रसंगी जिल्हा प्रभारी व प्रदेश सचिव कल्याणी मानगावे, प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, जिल्हा युवक उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी , चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदेश बोर्डे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा सरचिटणीस गौरव चौधरी, विरेंद्र गायकवाड, अनिकेत अरकडे, करण गील, कुदंन कसबे, बाळासाहेब डावरगावे, अनिल सोनकांबळे, फारूक खान,रोहीत शेळके,शैलेश अनंतराव, स्नेहल गायकवाड, चंद्रशेखर जाधव, तुषार पाटील, अदित्य खराडे आदि पदाधिकारी व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.