जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा ( पश्चिम) पदाधिकारी नियुक्त्या आज जाहिर करण्यात आल्या.
जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा ( पश्चिम)च्या मिटींग मध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्षा सुनिताताई शिंदे यांनी जाहिर केल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिवमती अश्विनीताई मनोहर पाटील यांची जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा ( पश्चिम) च्या सचिव पदी निवड करण्यात आली.शिवमती हेमाताई ग्यानी यांची जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा ( पश्चिम) च्या संघटक पदी निवड करण्यात आली.तसेच कासारसाईच्या जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी योजनाताई टाव्हरे, कार्याध्यक्ष पदी योजनाताई सोनवणे , सचिव पदी अंजलीताई कानडे व उपाध्यक्ष पदी शुभांगीताई त्र्यंबके यांच्या निवडी करण्यात आल्या.
या सर्व जणींना जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा पुणे ( पश्चिम) सुनिताताई शिंदे व जिल्हा उपाध्यक्षा माणिकताई शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.या वेळी जिजाऊ ब्रिगेड च्या सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.