( विजय जगताप)
पिंपरी पालिकेत अवघा एक नगरसेवक अशी संख्या असलेल्या मनसेनं आपलं शहरातील कार्यालय थेट काही फुटांवर असलेल्या महापालिका व मेट्रोच्या दारात थाटून आज जंगी बार उडविला.
तब्बल साडेतीन वर्षांनंतर शहरात आलेल्या मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यालयाचे उद्घाटन केलं खरं मात्र मौनी राग आळवून ते लगेच निघूनही गेले.
ठाकरे नाव व परंपरेला साजेसे व शोभेसे स्वागत करण्यात पिंपरी चिंचवड शहरातील मनसे कार्यकर्ते मात्र तनसे व धनसे राबल्याचे प्रथमच दिसून आले.
‘देर सही दुरूस्त सही ‘या उक्तीप्रमाणे मागून का होईना पण थेट पालिकेसमोरच कार्यालय आल्याने मनसे मध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
पिंपरीवर तसं पाहिलं तर दोनही ठाकरे बंधूचं प्रेम अळणीचं स्वरूपाचं असल्याचा इतिहास आहे.मूड हाच स्थायी भाव असलेले राज ठाकरे आज शहरात आले हेच विशेष मानावे लागेल.