,————
मधुकर बच्चे युवा मंच वतीने केशवनगर चिंचवड येथे जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड प्रभागातील अनेक महिला आपल्या जबाबदाऱ्या संभाळून समाजात विविध क्षेत्रात समाजपयोगी काम करतात अशा कर्तृत्ववान महिलांना मधुकर बच्चे युवा मंच वतीने पुरस्कार देऊन सन्माननित करण्यात आले.
महावितरण आभियंता सौ.शीतल मेश्राम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे स्वागत केले.
नगरसेवक मोरेश्वर शेडगे,राजेंद्र गावडे,सुरेश भोईर,विठ्ठल भोईर,विठ्ठल सायकर,श्रीराम परबत ,राहुल भोईर,पोपट पवार,
भाजपा महिला अध्यक्षा उज्वला गावडे,नगरसेविका जयश्री गावडे शोभा भराडे,अपर्णा मणेरीकर,प्रा .माधुरी गुरव,संजीवनी पांडे,सिमरन मौलवी,सरिता डोंगरे,निकिता चिंचवडे,पल्लवी पाठक,ऍड अभिलाषा गोलांडे,प्राजक्ता पत्की,कविता खिंवसरा,रेखा जाजू, आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
रोहिणी बच्चे,सोनाली कुलकर्णी,अर्चना बच्चे,श्रद्धा शिंदे,श्रावणी बच्चे,तन्वी कुलकर्णी,आसावरी बच्चे,सई कुलकर्णी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास पुढाकार घेतला. सौ.अल्पना गोडबोले यांनी सूत्र संचालन केले.
भाजपा भटके विमुक्त पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ शिंदे गणेश बच्चे,राजू कोरे,किरण वाल्हेकर,पोपट बच्चे,राजेंद्र चौधरी,मुकुंद गुरव आदींनी कार्यक्रमास पुढाकार घेतला.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉ. वनमाला मुळीक,डॉ. मानसी पानगांवकर डॉ. शलाका कानोडे, डॉ. मोनाली पाटील,रणरागिणी, मोनिका गोळे
अभिलाषा गोलांडे, निकिता चिंचवडे, सोनल चांडक, सुनीता पाटील, वर्षा गरवारे,पत्रकार आशा साळवी,सरिता डोंगरे,ज्योती शिंदे,स्नेहल घेरडे, शिक्षिका रुपाली कांडर,पुष्करणी देशपांडे,कविता जोशी अल्पना गोडबोले,आदी महिला व युवतींचा यावेळी सन्मान करण्यात आला.