विचार असो की कुठलीही भावना ती व्यक्त व्हायला हवी, शरीर स्वास्थ्यासाठी ते आवश्यक आहे असे विचार प्रसिद्ध समुपदेशक सौ सरिता चितोडकर यांनी येथे व्यक्त केले.
श्री स्वामीसमर्थ सेवा प्रतिष्ठान संचालित, जेष्ठ नागरिक संघ शिवतेज नगर, च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी समुपदेशीका सौ.सरिता चितोडकर यांचे “आयुष्याचा सुखद उत्तरार्ध “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी मा. महापौर नगरसेविका मंगला कदम ह्या होत्या. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित होते.
जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष प्रा. हरीनारायण शेळके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी अर्चना तौडकर, कुशाग्र कदम उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली. मंगला कदम म्हणाल्या, महिलांनी आपल्या इच्छे प्रमाणे जीवन जगावे, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात असे म्हटले. तर श्री बहिरवाडे यांनी, महिलांचे सक्षीमीकरण होत असून सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे असे अभिमानाने सांगितले. प्रास्ताविक प्रा. हरीनारायण शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सारिका रिकामे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सदाशिव पाटील, शिंदे सर, शोभा नलगे, मनीषा देव, नीता खरे, कांचन नेवे इ. परिश्रम घेतले.