कोरोना संकटकाळात महत्त्वाचे कार्य करत असलेल्या पोलिस दलातील बांधवांना एन-९५ मास्क व सॅनिटायझरचे वाटप अंजोर फाऊंडेशनच्या वतीने आज करण्यात आले.
या सामाजिक संस्थेच्या सचिव स्नेहल आंगले व पदाधिका-यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अनुक्रमे बिबवेवाडी,भारती विद्यापीठ , सहकार नगर व सांगवी या चार पोलिस ठाण्यांना भेट देऊन या आरोग्यविषयक साहित्याचे वाटप केले.