आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोना रूग्णांचा उच्चांक गाठलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता झपाटयाने कोरोना कमी होत असल्याचे चित्र आहे.
आज( मंगळवार) अवघ्या २४६ रूग्णांची नोंद पाॅझिटिव्ह म्हणून नोंदविण्यात आली असून त्यामधील दोन रूग्ण शहराबाहेरील आहेत.मागील एक आठवड्यापासून कोरोना रूग्ण संख्येचा वेग विलक्षण गतीने कमीकमी होत असल्याने पालिकेने सुरू केलेली खासगी कोविड सेंटर बंद करण्याचा घेतलेला निर्णय तसेच आता कोरोना झाला तरी घरीच उपचार करण्याची नागरिकांची झालेली मानसिकता पाहता आता या संकटाला नागरिकही सरावले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धोका टळलेला नसला तरी एप्रिल महिन्यात धडकी भरायला लावणारा हा रोग आता हसत खेळत नागरिक स्विकारत असल्याचे व कोरोना झाला तरी गंभीरपणे आता याकडे पाहिले जात नाही असे नागरिकांच्या वर्तन व बिनधास्त शैलीवरून आढळून येत आहे.
दरम्यान येत्या आठ पंधरा दिवसात रूग्णांची वाट पहायला लागते की काय, इतका रूग्ण संख्येचा आलेख खाली येईल अशी चिन्हे आहेत.