( विजय जगताप)
राममंदिर भूमीपूजनाचा आनंद आज तब्बल १० लाख लाडू बनवून शहरभर ते वाटत हा परमोच्च क्षण शहर भाजपने दिमाखात पार पाडला. या इव्हेंटचे शिल्पकार ठरले आमदार व भाजप शहर अध्यक्ष महेश लांडगे..!
अफाट व अाश्चर्यचकीत करणारे इव्हेंट साजरे करण्यामध्ये आमदार लांडगे यांचा हात शहरात कोणी धरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.राममंदिर भूमीपूजन हा देशातील तमाम हिंदू बांधवांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय असल्याने हा आनंद तितक्याच तोडीचा व लाजवाब व्हावा यासाठी आमदार लांडगे यांनी शहरवासियांना १० लाख लाडू वाटण्याचे ठरविले. मात्र कोरोना काळ असल्याचे कारण पोलिसांनी त्यांना हा कार्यक्रम घेऊ नये अशी नोटीस काल बजावली, त्यामुळे केलेली तयारी व आनंदावर विरजण पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली. अखेर नडणे व भिडणे यामध्ये वस्ताद असलेल्या महेश दादांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर हा कार्यक्रम सोशल डिस्टींक्शन पाळत व अन्य धर्मीय बांधवांच्या भावनांना इजा न पोहोचविता यशस्वी करून दाखविला.
दस्तूरखुद्द अयोध्येत आज १ लाख ११ हजार लाडू प्रसाद म्हणून बनविण्यात आले होते तर इंदोर मध्ये ५ लाख लाडू नागरिकांना वाटण्यासाठी तयार करण्यात आले .मात्र पिंपरी चिंचवडमध्ये बनलेले १० लाख लाडू ही देशातली सर्वात मोठी बातमी ठरली.
आमदार लांडगे यांनी,श्रीराम भक्तांच्या मनातील भावना व्यक्त व्हाव्यात, यासाठी शहरात ठिकठिकाणी लाडू वाटप करून सोहळा साजरा केला व , हिंदु बांधवांमध्ये जल्लोशाचे वातावरण निर्माण केले.
या सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी, नगरसेवकांनी तसेच नागरिकांनी भरभरून कौतुक केले. हिंदु धर्मियांचे स्वप्न आज साकार झाल्याची प्रचिती येत असल्याची भावना अनेकांनी आमदार लांडगे यांच्याकडे बोलून दाखविली. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पाडण्यात आला. नागरिकांनी ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी आपापल्या प्रभागामध्ये लाडू वाटप केले. सर्व भागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना हा प्रसाद दिला. शहर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या सोहळ्यात सहभाग घेतला. भाजपच्या सर्वच पदाधिका-यांनी आमदार लांडगे यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या.