सीएसआर फंडातून पितांबरी कंपनीने चिखली येथील पालिकेच्या घरकुल प्रकल्पातील पाच सोसायट्यांना सोलर उर्जेची उभारणी करण्यात आली.
घरकुल फेडरेशनचे पदाधिकारी अशोक मगर यांच्या मागील तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून पाच सोसायटयांमध्ये हा प्रकल्प बसविण्यात आल्याने वार्षिक २० लाख रूपये वीजबिलातून या सोसायट्या मुक्त झाल्या आहेत.
A17,B28, B30,B31 व C27 अशा या पाच सोसायट्यांमध्ये सोलर बसविण्यात आला असून लवकरच उर्वरित ११५ सोसायटयांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न असून कालांतराने संपूर्ण शहर या भागाला घरकुल सोलर सिटी म्हणून ओळखेल असा विश्वास अशोक मगर यांनी बातमी खासशी बोलताना व्यक्त केला.
युवराज निलवर्ण, सुरेश सांडूर व आबासाहेब गवळी या सहका-यांबरोबरच डेटम कंपनी, पितांबरी कंपनी व सहवास रोटरी क्लब पुणे यानीही घरकुलला हा प्रोजेक्ट करण्यासाठी खुप मेहनत घेतली.