चिंचवड येथील ज्येष्ठ गायक-संगीतकार कै. वसंतराव जोशी यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने आज भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यानिमित्ताने मोरया गोसावी समाधी मंदीराकडे जाणा-या कै. वसंतराव जोशी मार्ग या नाम फलकाला, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्ष नेते श्री.नामदेव ढाके यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पत्रकार दादाराव आढाव, दीपक श्रीवास्तव, मदन जोशी, अविनाश तिकोने, दीपक गीते, मंगेश कवी ,सुहास घुमरे, आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ व्यापारी धोंडीराम सायकर यांनी या प्रसंगी आदरांजली वाहिली.