कोरोना संकट काळात जनतेच्या सेवेसाठी तन मन व धनाने कार्यरत राहिलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील १८ कोरोना योध्यांचा गौरव नुकताच पवित्र अशा आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आला.
या प्रतिकूल परिस्थितीत या समाजसेवकांनी, अन्नदात्यांनी व आरोग्यदूतांनी समाजाची सेवा केल्याबद्दल त्यांचा “कोरोना योध्दा” म्हणून गौरव करण्यात आला.
पी.के.स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, उद्योजक संजय भिसे यांच्या हस्ते या मान्यवरांना गौरविण्यात आले.सत्काराचे स्वरूप गीर गाईच्या शेणापासून तयार केलेले तुळशी वृंदावन, सन्मानपत्र, वारकरी उपरणे,अबिर असे होते.१८ जणांना का तर पंढरीची वारी अठरादिवसांचीआहे ,ज्ञानेश्वरी ग्रंथाला अठरा अध्याय आहे. या १८देवदूतांमध्ये १.मा. श्री मुरलीधर मोहोळ ( महापौर पुणे), मा. श्रीमती प्रतिभा ताई जोशी, (वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोथरुड पुणे), मा. श्री. बंडू शेट केमसे (मा. नगरसेवक सभागृह नेते पुणे म. न. पा.), मा. सौ.लक्ष्मी ताई दुधाने (मा. नगरसेविका पुणे. म.न.पा), मा. श्री उमेश महाडिक (रुग्णसेवक प्रहार संघटना), मा.श्री विजय पारगे (पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष), मा. डॉ. हेमा ठिगळे (डॉक्टर. वैद्यकीय सेवा), मा. श्री विजय किसन बराटे (वारकरी सेवक), मा. श्री. विजय खळदकर (सामाजिक कार्यकर्ते), मा. श्री . सम्राट खराटे (अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नियंत्रण संस्था), मा.सौ. श्री कुंदाताई संजय भिसे (उन्नती सोशल फाउंडेशन), मा. श्री. महेश स्वामी (संस्थापक नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान), मा.श्री.खंडू शेठ चिंचवडे (सामाजिक कार्यकर्ते ), मा.श्री. संदीप जोशी (उद्योजक), मा.श्री.अतुल दौंडकर (सामाजिक कार्यकर्ते), मा.श्री.योगेश जाधव (उद्योजक), मा. श्री.संतोष भाऊ बारणे (उद्योजक), श्रीमती आशा भट ( मंथन फाउंडेशन)
कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प ऋषिकेश महाराज चोरगे ( युवा कीर्तनकार ), ह.भ.प विजय तात्याबा बोत्रे (उद्योजक ), ह.भ.प सुनील राणू म्होकर ( उद्योजक )यांनी केले होते.