कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन आणि दैनंदिन भाजीपाल्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपाचे राजू दुर्गे यांनी सुरू केलेल्या सेवाभावी स्वस्त भाजीपाला केंद्रावर नागरिकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे.
कोरोना संकटकाळात शहरातील गोरगरीब नागरिकांच्या सोयीसाठी २८ मार्चपासून अन्नदान नंतर धान्यवाटप आणि आता गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या स्वस्त भाजीपाला या उपक्रमामुळे शहरात दुर्गे यांचे कौतुक होत आहे.
आपल्या काळभोरनगर येथील कार्यालयातच थेट शेतक-यांना विक्रीसाठी दालन उपलब्ध देत त्यांनी शेतक-यांची व नागरिकांची सोय करत नागरिकांना फळभाज्या, पालेभाज्या, फळे अत्यंत माफक दरात उपलब्ध होण्याची सोय केली आहे. सदर ठिकाणी शहराच्या विविध भागातून नागरिक येत असल्याचे चित्र आहे. आलेल्या नागरिकांनी एकदम गर्दी करू नये यासाठी त्यांनी सोशल डिस्टींक्शनच्या नियमांची पुरेपूर काळजी त्यांचे कार्यकर्ते घेत असून सॅनिटायझर फवारणी करून नागरिकांना भाजी घेण्यासाठी येथे सोडले जाते. नागरिकांच्या माहितीसाठी आज येथील भाजीपाल्याचे असलेले दर पुढील प्रमाणे :-
आज मिळणाऱ्या फळ, भाज्या आणि त्यांचे आजचे दर.
👉 कोबी : 30 रुपये किलो.
👉 फ्लॉवर : 40 रुपये किलो.
👉 कांदा एक किलोचा दर 12 रुपये फक्त.
👉 कांदा : 10 किलोचे किट 100 रुपये फक्त.
👉 बटाटा : 25 रुपये किलो.
👉 लसुण : 120 रुपये किलो.
👉 बिन्स : 90 रुपये किलो.
👉 काटी वांगी : 30 रुपये किलो.
👉 टोमॅटो : 20 रुपये किलो.
👉 ढोबळी मिरची : 40 रुपये किलो.
👉 दुधी भोपळा : 30 रुपये किलो.
👉 भेंडी : 40 रुपये किलो.
👉 पांढऱ्या भुईमुग शेंगा : 70 रुपये किलो.
👉 मक्याचे कणीस : 30 रुपये किलो.
👉 दोडका : 40 रुपये किलो.
👉 चवळी : 40 रुपये किलो.
👉 वाटाणा : 90 रुपये किलो.
👉 कारले : 40 रुपये किलो.
👉 काकडी : 30 रुपये किलो.
👉 कैरी लोणच्याची मोठी : 60 रुपये किलो.
👉 मेथी : 20 रुपये गड्डी.
👉 कोथंबीर : 20 रुपये गड्डी.
👉 पुदिना : 15 रुपये गड्डी.
👉 शेपु : 20 रुपये गड्डी.
👉 पालक : 20 रुपये गड्डी.
👉 लिंबु मोठे : 10 रुपयांत 5 नग.
👉 गवार इंग्लिश : 30 रुपये किलो.
👉 गवार गावरान : 40 रुपये किलो.
👉 काळी भरीत वांगी : 30 रुपये किलो.
👉 आलं : 70 रुपये किलो.
👉 साधी हिरवी मिरची : 40 रुपये किलो.
👉 तिखट हिरवी मिर्ची : 50 रुपये किलो.
👉 गाजर : 40 रुपये किलो.
👉 चिकु : 50 रुपये किलो.
👉 डाळिंब : 40 रुपये किलो.
👉 मोसंबी : 30 रुपये किलो.
👉 द्राक्षे घडाचे : 70 रुपये किलो.
👉 द्राक्षे सुटे : 40 रुपये किलो.
👉 पपई : 40 रुपये किलो.
👉 खरबुज : 25 रुपये किलो.
👉 स्थळ : मा नगरसेवक राजू दुर्गे यांचे कार्यालय, काळभोर नगर चिंचवड पुणे 19
👉 वेळ : सकाळी 10 ते रात्री 8 वाजे पर्यंत.
👉 संपर्क : 9890 200 200