गेले ७० दिवस दररोज शहरातील नागरिकांना अन्नदान करून विक्रम केलेल्या नटराज प्रतिष्ठान ही संस्था आता परिस्थिती थोडी सावरल्याने हे सेवाकार्य थांबवत आहे.
अनेक गरजू गरीब रिक्षा ड्राइवर, ट्रक ड्राइवर, बिगारी कामगार, सलून कारागीर, टेलर, घर काम करणाऱ्या महिला भगिनी, बेरोजगार युवक,गायक वादक सर्व कला क्षेञातील कलावंत, ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना दररोज न चुकता जेवण/धान्य किट /मास्क/ सॕनिटाईजर व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सलग त्यांनी सुरू ठेवले होते.
ही सर्व सेवा नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान व ओम नम: शिवाय आधिष्ठान व श्रावण मास तपोनुष्ठान व सर्व सहकारी मित्र परिवार यांच्या सहकार्याने सुरू केली होती.नुकतेच त्यांनी कष्टकरी कामगारांना मोफत सायकलीदेखील वाटप केल्या होत्या.