राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व
संत तुकाराम नगर ( पिंपरी-चिंचवड) गटाचे संघचालक अनिल नाईक ( वय ५५ ) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अनिलजी हे मूळ पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील बालपासूनचे स्वयंसेवक. सध्या ते पिंपळे गुरव येथे वास्तव्यास होते.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात त्यांनी ऑल्टो टेक ही कंपनी सुरू केली होती. मागील वर्षीच संत तुकाराम गटाचे संघचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
दुपारी १२.३० वाजता बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल जवळील स्मशानभूमी येथे मर्यादित नातलगांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.