( विजय जगताप)
कोरोना रोखण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी अपयशी ठरल्याचा आरोप करून भाजपने उद्या ( शुक्रवारी) जाहीर केलेल्या ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ या निषेध आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनीही शड्डू ठोकले आहे.
शुक्रवारी ( ता .२२) सकाळी अकरा वाजता या आंदोलनाच्या युध्दाला सुरूवात होत असून सोशल मिडियाच्या प्रचंड ताकदीवर दोन्ही पक्षांची पूर्ण भिस्त असणार आहे. भाजपचे कार्यकर्ते काळे झेंडे व काळे कपडे घालून “ उध्दवा, अजब तुझे सरकार” असा नारा देणार आहेत तर प्रत्युतर म्हणून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपल्या अंगणातच भगवे ध्वज फडकावून उध्दव ठाकरे यांना समर्थन देणार आहे.
सद्यस्थितीत सोशल मिडियात भाजपच्या चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या नाव व व्यक्तिमत्वावरून मागील दिड दोन महिन्यांपासून यथेच्छ धुलाई सुरू आहे. ही धुलाई इतकी तीव्र आहे की, सोशल मिडियाचा जनक असलेला भाजपच टिकेमुळे हैराण झाला आहे.
त्यामुळे आता सामना बरोबरीत सुटतो की कसा हे पाहणे औत्सुक्याचे आहे