पोलीस काॅन्स्टेबल रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने निलेश हाके यांनी भटक्या समाजबांधवांना आज अन्नधान्य वितरीत केले.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगारांच्या कामावर गदा आली आहे.नेहमी गरीब व होतकरू नागरिकांच्या मदतीला असणारे पोलीस रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुगेवाडी मधील गरीब लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गजानन बनसोडे ,पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला च्या सौ. शीलामामी जाधव यावेळी उपस्थित होते.