कोरोनाच्या संकटकाळात रिक्षाचालकांच्या व्यवसायास परवानगी नसल्याने हातावर पोट असलेल्या या मंडळींना मोठया अडचणीतून जावे लागत आहे. हि बाब ध्यानात घेऊन पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला गटातर्फे आज दापोडी येथील रिक्षावाल्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, सौ. शीलामामी जाधव, मा. उपविभाग प्रमुख प्रमोद गायकवाड, मा. शाखाप्रमुख राहुल जाधव, अजित पठाण, अमर शेख, महेश काटे, प्रशांत ढमाले, उपस्थित होते.