कोरोनाच्या संकटात वडगाव व कामशेत भागातील गोरगरीब ४०० कुटूंबाना शिवराज गुपच्या वतीने अन्नधान्य वाटून त्यांना दिलासा देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत व अडचणीत सापडलेल्या कुटूंबाना मदत करण्यात वायकर कुटूंबिय आपल्या शिवराज समुहातर्फे कायम आघाडीवर असतात.
कोरोनामुळे आज मावळामधील अनेक गरीब कुटूंबाचे जगणे अडचणीचे झाले असल्याने त्यांच्या मदतीला हा परिवार धावला आहे. याच बरोबर कामशेत, वडगाव येथील पोलिसांना जेवणाची सोयही त्यांनी करून दिली आहे.सध्याच्या व्यस्त दिनक्रमात पोलिस प्रशासनाला ते करत असलेले सहकार्य पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.