कोरोनाचे संकटाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळात वर नमूद केलेल्या शहरातील या चार भागात कोरोना संशयित रूग्ण सापडल्याने तातडीचा व खबरदारीचा उपाय म्हणून हा परिसर सील करण्यात आला आहे.
तरी देखील काही नागरिक घरांच्या आसपास, पाण्याच्या टाकीवर, टेरेसवर , सोसायटी कंपाऊंडच्या आत एकत्र येत असल्याचे आढळून येत आहे.
या सर्वांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे की, ड्रोन कॅमेरे व सॅटेलाईटच्या सहाय्याने अशा नागरिकांवर आता करडी नजर ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
आपल्याला कोणी पाहत नाही असा समज कोणी करत असेल तर त्यांनी आताच काळजी घ्यावी. आपल्या एका चूकीने संपूर्ण परिसर कोरोनाबाधित होऊ शकतो.
—————————————-
अधिक माहितीसाठी संपर्क
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
नियंत्रण कक्ष-020-27450661