कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत निराधार , गरजू , कुटुंबीयांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत त्यांना पोटभर अन्न मिळण्यासाठी हॅपी मोमेंट फाऊंडेशन (पुणे)च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरांमधील असलेले मजूर व गरजुवंत कुटुंबियांना संध्याकाळचे जेवण देण्यात आले.
बसस्थानकासह शहरातील विविध भागात निराधार लोक भटकत फिरत असतात परिसरातील हाॅटेल मधून मिळणार्या अन्नावर हे निराधार लोक पोट भरत असतात परंतु सध्या कोरोना ( COVID-19 ) विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर शहरातील हाॅटेलही बंद आहेत. त्यामुळे अशा निराधारांचे हाल सुरू झाले आहे.
अशा परिस्थितीत या निराधारांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून हॅपी मोमेंट फाऊंडेशन (पुणे)टिम ने पुढाकार घेऊन एक मदतीचा हात पुढे केला आहे.