करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21दिवसाचे लॉकडाउन सुरु झाल्याने नागरिक कुटुंबसहीत घरातच आहे. गेले 8दिवसा पासून युवासेना पिंपरी विधानसभा व आशीर्वाद महिला बचत गटाकडून जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे ह्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून गोरगरीब नागरिक, विध्यार्थी ह्यांना मोफत भोजनचा कार्यक्रम चालू आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य जबाबदारीं ने पार पाडत आहे. आज दापोडी -फुगेवाडी मधील सर्व सफाई कामगार ना मोफत भोजन वाटप करण्यात आले. ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला गटाच्या सौ. शीला मामी जाधव, रोहित गोरे, रमेश तात्या जगताप, महेश बोधले, अंजन बंगारी,उपस्थित होते.