‘बातमी खास’ या नव्या वेब न्यूज पोर्टलच्या कामकाजाचा शुभारंभ स्नेहीजनांच्या उपस्थितीत आजपासून (शनिवार) झाला.
विवेकनगर आकुर्डी येथील कार्यालयात आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन झाले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली होती. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, पिंपरी महापालिकेच्या संगीत कला अकादमीचे कला शिक्षक मिलिंद दलाल, श्री जगद्गुरू प्रतिष्ठानचे ॲड. लक्ष्मण रानवडे, सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड, गौतम कांबळे, कै वसंतराव जोशी नाट्य संस्थेचे अध्यक्ष मदन जोशी, लक्ष्मण मुदळे, अरुण ओव्हाळ, वेब डिझायनर तेजस भंडारी, आदी यावेळी उपस्थित होते. कार्यकारी संपादक विष्णू मांजरे यांनी सर्वांचे स्वागत केले. व्यवस्थापक रामेश्वर राऊत यांनी कार्यालयातील विविध विभागांची व अद्यावत संदर्भ ग्रंथालयाची माहिती उपस्थितांना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माहिती अधिकारी संतोष तोडकर, पालकमंत्री गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ खांदवे, लोकमतचे पिंपरी ब्युरो चीफ विश्वास मोरे, पुण्यनगरीचे संपादक मिलिंद वैद्य, जनशक्तीचे संपादक अविनाश म्हाकवेकर, जाहिरात विभाग प्रमुख अमित शिंदे, एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, पवना समाचारचे संपादक अरुण कांबळे, यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.