पुणे दि. १५,
राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजन केलेले असलेल्या बेरोजगारीवर आधारित ‘यंग इंडिया के बोल’या वक्तृत्व स्पर्धेचे राज्य स्तरावरील आयोजन आज करण्यात आले. पुणे शहरातील केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृह मध्ये या स्पर्धा सकाळी ११ पासून घेण्यात आल्या.
“बेरोजगारीची नोंदणी राष्ट्रीय स्तरावर करण्यात यावी म्हणजेच (NRU) यासाठी युवक काँग्रेस विविध प्राकारची आंदोलने करत आहे यापूर्वी देखील पोस्टर्स, सह्यांची मोहीम असे उपक्रम राबविले गेले आहेत आता वक्तृत्व स्पर्धे द्वारे युवक-युवतीचे या विषयावर विचारमंथन व्हावे यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत व विजेत्यानां राष्ट्रीय फेरी साठी पाठवण्यात येणार आहे” असे युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष विशाल मलके यांनी सांगितले.
युवकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बेरोजगारीवर आपले मुद्दे मांडले, देशातील आर्थिक परिस्थिती हीच तरुणाची बेरोजगारी निर्माण होण्याचे कारण आह या विषयावर बहुतांश मते मांडून बेरोजगारी ची भीषण अवस्था कशी निर्माण झाली याबाबत भावना व्यक्त करण्यात आल्या.
“बापाचा घाम विसराण्या इतके नालायक आम्ही नक्कीचं नाही पण भ्रष्ट डोनेशनच्या शिक्षणाने आम्हाला तेवढं सुद्धा लायक ठेवलं नाही.”
“साहेब, फक्त एकचं सवाल, आमचं वर्तमान आणि भविष्य कुठे हरवलं आहे… आणि सांगा, आम्हा बेरोजगरांच तुम्ही काय करायचं ठरवलं आहे” अशी भावनिक आर्त स्पर्धकांकडून आली.
प्रथम पारितोषिक अलिबागच्या किरण किर्तिकर याला द्वितिय पारितोषिक पुण्याच्या कृष्णा तवले याल, तृतीय पारितोषिक सातारा च्या आशुतोष निकम ला व उत्तेजनार्थ ७ पारितोषिके अनुक्रमे सतिश अहिर धुळे, यश पाटील कल्याण, अभिजीत खोडके नागपूर, आयशा शेख वसई विरार, दर्शन भंडारे पालघर, निकीता बहिरट पुणे व करण पारिख नागपूर यांना मिळाले.
पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख बक्षीस रू.५०००, ३००० व २००० तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण भारतीय युवक काँग्रेस चे या स्पर्धेचे राष्ट्रीय समन्वयक सुबोध हरित्वाल व राज्य समन्वय सुप्रिया चव्हाण, प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, शिवराज मोरे, कपिल खोपे, बालाजी गाडे, विशाल मलके, सोमनाथ दौंडकर, नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
परीक्षक म्हणून प्रा. संजय पवार, डॉ. पांडूरंग कंद, सोनाली शिंदे व विनोद वाघ यांनी जबाबदारी पार पाडली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, भारतीय युवक काँग्रेस चे या स्पर्धेचे राष्ट्रीय समन्वयक सुबोध हरित्वाल व राज्य समन्वय सुप्रिया चव्हाण, प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, शिवराज मोरे, कपिल खोपे, बालाजी गाडे, युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष विशाल मलके, पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, समीर शेख, अभिजीत रोकडे, उमेश पवार, युनुस बागवान, सुरज पंडीत आदि पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजन युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष विशाल मलके, पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले.