आज शिवसेना पिंपरी -चिंचवड शहर च्या वतीने आयुक्त श्रवण हार्डेकर यांना निवेदन देण्यात आले. दुर्घटनेला १ महिना उलटून हि पिंपरी – चिंचवड महानगर पालिकेतर्फे कोणतेही मदत दुर्घटनेतील मृत मजूर नागेश जमादार यांच्या कुटुंबियांना करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुतुबियांवर आर्थिक संकट ओढलेले आहे. नागेश यांच्या पाचात आई-वडील व चार बहिणी असा मोठा परिवार आहे. सध्या त्यांच्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे.
नागेश वरच त्यांचे सर्व कुटुंब अवलंबून होते. यापुर्वी संबधित अधिकारी त्यांच्याशी बोलेले असता त्यांनी मदत करण्याची ग्वाही दिली होती , मात्र ती त्यांनी पाळली नाही. म्हणून गुरुवार दि. १६ जानेवारी , २०२० रोजी शिवसेने कडून नागेश जमादार त्यांच्या कुटुंबीया समवेत धरणे आंदोलन करण्यात येईल , या वेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे ,शिवसेना गट नेते राहुलदादा कलाटे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट युवसेना विभाग संघटक निलेश हाके , मनोज बोरगे , विकास गायकवाड , उपस्थित होते.