विवाह समारंभातील मिरवणूक, डीजे, सत्कार सोहळा आदी खर्चिक उपक्रमांना फाटा देऊन पिंपरी येथील रानवडे कुटुंबाने गुरूकुलम अनाथालय व किनारा वृद्धाश्रमाला आर्थिक मदत आणि खाऊ वाटप केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य शासनाचा उत्थान पुरस्कार प्राप्त पिंपरीतील ॲड. लक्ष्मण रानवडे यांचे सुपूत्र ॲड. सुनिल रानवडे यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. या लग्न कार्यक्रमासाठी रानवडे परिवाराने डीजे, मिरवणूक, सत्कार, सजावट, रोषणाई आदी सर्व वाचवून सदर रक्कम क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या गुरूकुलम आश्रमाला २१ हजार २२१ रूपये मदतनिधी दिला. व येथील मुलांना खाऊ वाटप केले. याचबरोबर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन वधू-वरांनी आशिर्वाद घेतला.