सोहम सार्वजनिक ग्रंथालय, संत तुकाराम नगर येथे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम दिनांक 20/4/2019 रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी वाचक सभासद व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगन्नाथ नेरकर (संस्थापक/अध्यक्ष सोहम सार्वजनिक ग्रंथालय) यांनी प्रास्ताविक केले. मतदान करणे आपला अधिकार असून हा हक्क आपण बजावलाच पाहिजे. उत्तम समाज आणि समृद्ध देश घडविण्यासाठी आपले मत योग्य उमेदवारालाच दिले नाही तर मग सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार उरत नाही तरी सर्वांना विनंती की आपण मतदानाचा हक्क बजावून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा. असे आव्हान करण्यात आले श्री.प्रदिप बोरसे संस्थेचे सेक्रेटरी यांनी शपथ दिली. सौ.वर्षा बोरसे (ग्रंथपाल)यांनी आभार मानले.