अभिजीत गोफण
तरूणाईच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देण्यासाठी तसेच तरूणांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवार २४ एप्रिल रोजी पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमातून पिंपरी चिंचवडच्या युवक-युवतींशी संवाद साधणार आहेत.
शहरात तसेच सोशल मिडियावर या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत असून सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सुमारे २५ हजार युवक व युवती उपस्थित राहणार असल्याची माहिती शहर युवासेना प्रमुख अभिजीत गोफण यांनी आज ‘बातमी खास’शी बोलताना दिली.
या कार्यक्रमाला या आधी संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक व मुंबई या प्रमुख शहरात उत्सफूर्त प्रतिसाद लाभला होता. बुधवारी होणाऱ्या या कार्यक्रमात ते सुमारे २५ हजार युवकांशी थेट भेट तर ५ लाख युवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम १८ ते ३५ वयोगटातील
पिंपरी चिंचवडकरांसाठी खुला आहे.
युवकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची मोठया प्रमाणात नोंदणी केली असून इच्छुक तरूण www.adityasanvad.com या संकेतस्थळावर नोंदणी करून कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत १३ हजार युवकांची नोंदणी झाली आहे. जास्तीत जास्त युवकांनी ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांवर त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा असे आवाहन पिंपरी युवासेनेच्या वतीने अभिजीत गोफण यांनी केले आहे.