ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या मावळमधील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत आज येथे येऊन दर्शन घेतले.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईहून एका खासगी हेलिकॉप्टरमधून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे येथे आगमन झाले. यावेळी खासदार व मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे, आमदार ॲड गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, मच्छिंद्र खराडे व सेनेचे तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एकवीरा देवीचे दर्शन व आरती झाल्यानंतर ठाकरे कुटुंबिय पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.