मावळ लोकसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज पिंपरी येथील न्यायालय परिसरात येऊन वकील, पक्षकार व येथील नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या.
राष्ट्रवादी काँगेसच्या कायदा सेलचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी या भेटीचे आयोजन केले होते. याप्रसंगी पार्थ यांनी वकिलांच्या समस्या, व अपुऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. आज दिवसभर पार्थ यांनी आपला वेळ पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी दिला. सकाळी निगडीपासून त्यांनी नागरिकांच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली. पुढे काळभोरनगर, लालटोपीनगर, एमआयडीसी पिंपरी येथे ख्रिश्चन मेळावा नंतर कासारवाडी, फुगेवाडी असा दौरा करत नागरिकांशी संवाद साधला.