——
पिंपरी महापालिकेची व आयुक्तांची बदनामी होईल अशा बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल आयुक्त राजेश पाटील यांच्या वतीने पिंपरीतील एका न्यूज पोर्टेलच्या संपादकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
आपल्या वेब न्यूज पोर्टेलच्या माध्यमातून महापालिकेची, अधिका-यांची व एकूणच प्रशासनाच्या बातम्या प्रस्तुत केल्याने बदनामी झाल्याचे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आयुक्त राजेश पाटील हे ओडिशा राज्यात जिल्हाधिकारी असताना तेथील एका पत्रकाराने त्यांच्याविषयी बदनामी होईल अशा बातम्या वारंवार प्रसिध्द केल्या होत्या. समज देऊन, कायदेशीर कारवाईचा इशारा देऊनही तो पत्रकार ऐकत नसल्याने अखेर प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाकडे त्याची तक्रार करून पाटील यांनी त्यास वठणीवर आणले होते.
नुकतेच प्रसिध्द झालेल्या “ मोर ओडिशा डायरी” या आपल्या पुस्तकात आयुक्तांनी हा प्रसंग लिहिला आहे.
महापालिका आयुक्तांनी पत्रकारास बदनामी केल्याच्या वृत्ताबद्दल नोटीस पाठविण्याची पिंपरी महापालिका इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.