मद्यापासून सुटका, व त्यानंतरचा सुधारणेचा कार्यक्रम आणि या कठीण काळात अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हेल्पलाइनद्वारे आता उपाययोजना व ऑनलाईन सभेचे आयोजनाला सुरूवात झाली आहे.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी – एए) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात स्थापित असलेल्या समुहांद्वारे एएच्या कार्यक्रमाद्वारे आशा आणि मुक्तता प्रदान करते. जगभरामध्ये एए च्या मीटिंग सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी जसे की शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि संबंधित संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात.
अशाप्रकारे कोट्यवधी मद्यपी मद्यपान करण्यापासून दूर झाले आहेत. तथापि, या वेळी कोरोना साथीच्या आजारामुळे, सामाजिक अंतर दूर ठेवण्याच्या सूचनांमुळे सर्व सभा आणि संमेलन स्थाने बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आला आहे. ज्यामुळे एए संदेश प्रसारित करण्याच्या पद्धतींमध्ये तात्काळ बदल करण्यात आला आहे.
मद्यापासून दूर राहून सुधारणेचा कार्यक्रम व संदेश देण्यासाठी इतर पर्यायी साधनांद्वारे जसे की ऑनलाईन मीटिंग बाबत एएने जागतिक पातळीवर पाऊल टाकले आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये विविध भाषांमध्ये २०० ऑनलाईन सभा सुरू केल्या आहेत. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात २५ ऑनलाईन मिटींग्स आहेत. दारू थांबविण्याची ज्यांची इच्छा आहे आणि थांबलेली दारू थांबलेली रहावी अश्या व्यक्ती या ऑनलाईन मीटिंगमध्ये भाग घेऊ शकतात. या मिटींग्स पूर्णपणे विनामूल्य आणि निनावी आहेत (फक्त ऑडियो)व्यक्तींचे व्हिडिओ प्रसारित केले जात नाही.निनावीपणाची पूर्णपणे काळजी घेतली जाते व कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात नाहीत. सध्या काही पिणाऱ्या व्यक्तींनी अचानक दारू पिणे थांबवल्यामुळे त्यांना होणारा त्रास व स्वतःचे बरे वाईट करून घेणे अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अशा रूग्णांना वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि रूग्णालयात भरती करणे असे उपाय सुचविणे आवश्यक आहे. याकरिता शासनाने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस या बंधुभाव संस्थेने महाराष्ट्रभर स्वतःची हेल्पलाइन तयार केली आहे. ज्या व्यक्तींना दारू पिणे थांबविण्याची इच्छा आहे अशा व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंबीय, यांना ए.ए. बद्दल अधिक माहिती हवी असल्यास व एए कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी ऑनलाइन सभांना विनामूल्य उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए.च्या सदस्यांशी बोलू शकतात.
संदेश
———————-
जगातील कोट्यावधी लोकांसारखे मद्यापासून दूर राहून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी आम्ही ऑनलाईन सभांमध्ये आपले स्वागत करीत आहोत.
आम्ही एकेकाळी मद्यपाश या आजाराला बळी पडलो होतो आणि आम्हाला हे माहित आहे की स्वतःचे अनुभव कथन करणे ही पद्धत इतर मद्यपींना दारूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरते.
या कठीण काळामध्ये आशा आणि प्रेमाचा हा संदेश देण्यासाठी आम्ही वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम यातील आमचे हितचिंतक यांचेकडून सहकार्य घेत आहोत. कृपया खालील नमूद केलेले एएचे हेल्पलाइन नंबर प्रकाशित करावे ही नम्र विनंती.
एएच्या संपर्कासाठी भाषा पर्यायासह मुंबई व उर्वरित महाराष्ट्रासाठी हेल्पलाइन नंबर्स पुढीलप्रमाणे :
1) विजय 9920111772 (मुंबई – इंग्रजी, हिंदी)
2) मिलिंद 8291976574 (कल्याण – इंग्रजी, हिंदी)
3) अमोल 8888128883 (पिंपरी-चिंचवड / पुणे-मराठी)
4) सतीश 9822830363 (नागपूर- मराठी)
5) साईनाथ 8806517299 (गडचिरोली – मराठी)
6) रमेश 9372433749 (औरंगाबाद – मराठी)
आपला आभारी
अमोल
8888128883
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस पुणे इंटरग्रुप
बी क्लास ट्रस्टी – शिवा 9822623610
चेअरमन- अंकुश 9028158194
पी आय चेअरमन – सुभाष 8888530694
सेक्रेटरी – संतोष 8600743100
डेलीगेट- यशवंत 9422709019
पुणे इंटरग्रुप हेल्पलाईन नंबर: 9049457757