सक्तीने घरी थांबावे लागत असल्याने गोरगरीब नागरिकांना उत्पन्नापासून मुकावे लागत असल्याने वीजबिल भरणेकामी त्यांना सवलत दयावी अशी मागणी युवासेनेने महावितरणकडे आज केली.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हूणन सरकारने जमावबंदी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधील बहुतेक उद्योग ठप्प झाले आहे. फुगेवाडी-दापोडी परिसरात मोलमजुरी करून कमविणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. कोरोना संसर्गमुळे नागरिक घरी बसून आहे. त्यामुळे ज्यांचे विदयुत बिल राहिले असेल किंवा या महिन्यात राहतील अशा नागरिकांचा वीजपुरवठा या महिन्यात खंडित करू नये अशी मागणी विदयुत अधिकारी श्री. सोनवणे यांना पिंपरी युवासेनेच्या वतीने निवेदन देवून करण्यात आली.
निवेदन देताना पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला संघाच्या सौ. शीलामामी जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची, अंकुश जाधव, शुभांगी गायकवाड उपस्थित होते.