( विजय जगताप )
शहरातील बकालपणा दूर करण्यासाठी विशेष मोहिमा सुरू करून धडाकेबाज कारवाई करत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची छबी आता होर्डिंग्जवर झळकली आहे. शहरातीलच एका प्रसिद्ध बिल्डरने अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केल्याने संपूर्ण शहरवासीयांचे आता लक्ष वेधले गेले आहे.
पिंपळे सौदागर – रहाटणी येथील कोकणे चौकातील हे भव्य होर्डिंग्ज या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या हजारो जणांचे लक्ष वेधून घेत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त ; श्री. राजेश पाटील यांच्या कार्यशैलीबद्दलचा एकप्रकारे सन्मान व आदरभावच या होर्डिंगवर व्यक्त करण्यात आला आहे. होर्डिंग्ज लावणाऱ्याने आपले नाव अथवा व्यवसाय मुद्रेचा जाणीवपूर्वक उल्लेख यामध्ये टाळला आहे. ‘बातमी खास’ने , होर्डिंग्ज लावणा-याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता
या भागातीलच असलेल्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या लोगो टायटल ब्रँडचे डिझाईन व कलर कोड आणि फ्लेक्सवरील डिझाईन व कलर कोड जुळत असल्याने होर्डिंग्ज कोणी लावले असावं ?… . हे बातमी खास टीमने नेमकं हेरलंही !!… .
‘ स्मार्ट सिटीमध्ये सात वर्षांपूर्वी शहराची निवड झाली, पायाभूत कामेही झाली, मात्र चांगल्या प्रोजेक्टच्या ठिकाणी अनधिकृत शेड, टपर्या उभ्या राहिल्याने शहराला एक प्रकारे बकालपणा व सूज आली होती. बिल्डर, विकसक मंडळी रीतसर बांधकाम परवानगी, पालिकेची फी भरून कोट्यवधींचे प्रकल्प करतात मात्र, अशा ठिकाणी काही नतद्रष्ट मंडळी बेकायदेशीरपणे रस्त्यांवर टपऱ्या, शेड, ढाबे उभारून त्या परिसराचे सौंदर्य खराब करतात. हे प्रमाण शहराच्या चारही भागात प्रचंड वाढले होते ‘ !!.. .
मात्र , ” आयुक्त; पाटील यांनी, स्वच्छ भारत व स्मार्ट सिटी या पथदर्शी मॉडेलच्या अनुषंगाने शहर स्वच्छतेची जी मोहीम राबवली त्यामुळे कदाचित प्रभावित होऊन हे होर्डिंग लावले गेले असू शकते ” !!… .
सध्याच्या राजकीय नाट्य व घडामोडी पाहण्यामध्ये संपूर्ण शहरवासीय मशगूल असताना आयुक्त; श्री. राजेश पाटील यांच्या कार्यपद्धतीविषयी शहरातील एका बड्या उद्योगसमूहाने वा ‘बिल्डर’ने त्यांचे काम आवडले आणि अभिमान वाटला म्हणून असे होर्डिंग्ज लावणे, ही शहरासाठीही पहिल्यांदाच पाहण्यात आलेली; अनोखी पण, भूषणावह अशीच बाबच आहे.