दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व अशी तिहेरी ओळख असलेल्या भोसरीतील पै योगेशदादा लांडगे व रूपालीताई लांडगे या पती-पत्नीने यंदाची दिवाळी वंचित व निराधारांबरोबर साजरी करून सामाजिक बांधिलकीची ओळख सर्वांना करून दिल्याची घटना काल घडली.
मावळ तालुक्यातील कुसवली या गावात असलेल्या सहारा वृध्दाश्रमात हा ह्दयस्पर्शी सोहळा रविवारी पार पडला.
भोसरीतील जय महाराष्ट्र महिला बचत गट व पै योगेश दादा युवा मित्र परिवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
नुकताच पै योगेशदादा लांडगे यांचा वाढदिवस त्यांच्यावर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात साजरा केला होता. मात्र शोषित, वंचित यांच्याबरोबर दिवाळी साजरा केल्यानंतरच वाढदिवस साजरा केल्याचे समाधान आपल्याला लाभेल अशी इच्छा पै योगेशदादा लांडगे यांनी व्यक्त केली होती.
त्यानुसार सहारा वृध्दाश्रमात हा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला.सर्व आजोबांसाठी कपडे, आजींसाठी साडी, मिठाई, दिवाळी फराळ, सुगंधी उटणे, अत्तर, मोतीसाबण ,फळे, ड्रायफुट आदी खाद्य वस्तू बचत गटाच्या अध्यक्षा रूपालीताई लांडगे यांनी सर्वांना यावेळी दिल्या. तसेच औक्षण करून त्यांचे आशिर्वाद घेतले.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना रूपालीताई लांडगे म्हणाल्या की, दिवाळी हा प्रकाशाचा सण असून अंधकार व निराशामय जीवन झालेल्या आजी आजोबांच्या जीवनात या सणासुदीच्या काळात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
तर योगेशदादा लांडगे यांनी आपल्या मनोगतात ,आमचे नेते व मार्गदर्शक आमदार महेशदादा लांडगे यांनी वंचित तसेच अनाथांबरोबर दिवाळी सण साजरा करण्याची सुचना केल्याने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी वृध्दाश्रमात करत असून त्याचे आम्हाला खुप समाधान असल्याचे म्हटले.
यावेळी त्यांच्या समवेत शिल्पा सुर्वे,अश्विनी तळेगावकर,सारिका लांडगे,धनश्री जांभळे,कल्पना यादव,स्वाती सातकर,राधाताई भारमल,मिनाक्षी काते,पल्लवी काशिद, डाॅ दिनकर कदम , सहारा वृध्दाश्रमाच्या संचालिका प्रा. तृप्ती जगताप, व्यवस्थापक अंशुल जगताप आदी उपस्थित होते.
पै. योगेशदादा लांडगे युवा मित्र परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कुसवली गावातील ग्रामस्थदेखील आवर्जून यावेळी उपस्थित होते. सहारा वृध्दाश्रमातील आजी जया नाईक यांनी सर्वाचे आभार मानले.