पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त राजेश पाटील यांची आज राज्य शासनाने पुण्यात सैनिक कल्याण विभागाचे संचालक पदी नियुक्ती केली.
पिंपरी आयुक्तपदावरून १६ ऑगस्ट रोजी अचानक तडकाफडकी बदली करत राज्य शासनाने त्यांची पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली होती. मात्र कौटुंबिक कारणास्तव राजेश पाटील यांनी तेथील पदाची सूत्रे स्वीकारली नव्हती. गुरुवारी (ता.२९) रोजी राज्य शासनाने राज्यातील ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यामध्ये राजेश पाटील यांची पुण्यातील सैनिक कल्याण विभागाचे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.