———————– देशातील पहिली महिला ऑफशोअर फ्लाईंग कॅप्टन व 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त बालकलाकार आकांक्षा पिंगळे यांचा आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते भव्य सत्कार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सोहम सार्वजनिक ग्रंथालयात तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक 13/8/2022 रोजी ध्वजारोहण मा. डॉ. अशोक डोंगरे साहेब पी.आय पिंपरी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी यूपीएससी,एमपीएससी विद्यार्थ्यांना त्यांनी आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन केले चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चितपणे मिळते असे त्यांनी विशद केले. त्याचप्रमाणे 14/8/2022 रोजी मा.योगेशजी बहल साहेब मा. महापौर पिंपरी चिंचवड मनपा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.त्याप्रसंगी ते म्हणाले सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे व अभ्यासिकेचे कार्य पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभा प्रमाणे आहे.तसेच त्यांना नेरकर सरांचे मोलाचे मार्गदर्शनाची जोड आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात व नोकरीही तिकडेच करतात विद्यार्थ्यांनी असे न करता परदेशात शिक्षण घेतल्यानंतर आपल्या टॅलेंटचा उपयोग आपल्या देशासाठीच केला पाहिजे कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न करत असताना अपयश आले तरी निराश न होता दुसऱ्याही क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्याचाही विचार करावा असे त्यांनी विशद केले. दि.15/8/2022 रोजी 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी वर्षाचा ध्वजारोहण पिंपरी चिंचवडच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. उमाताई खापरे यांच्या हस्ते संपन्न झाला .त्याप्रसंगी त्यांनी सोहम सार्वजनिक ग्रंथालय पिंपरी चिंचवड मधील आदर्श ग्रंथालय असून सोहम ग्रंथालयातील अभ्यासिकेतून विद्यार्थी घडवण्याचे मोलाचे कार्य होत आहे. याप्रसंगी पिंपरी चिंचवड मधील मयुरी देशमुख यांना पहिली महिला आॕफ शोअर फ्लाईंग कॅप्टन होण्याचा बहूमान मिळाल्या बद्दल सौ. उमाताई खापरे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला चिकाटी आणि मेहनतीच्या पंखाच्या आधारे यशाच्या दिशेने गगन भरारी घेणारी वैमानिक मयुरी देशमुख हिने देशातील पहिली महिला आॕफ शोअर फ्लाईंग कॅप्टन होण्याचा बहुमान मिळविला आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न मयूरीने पाहिले होते आणि ते जिद्दीने पूर्णही केले. तिने आॕफ शोअर फ्लाईंगऑपरेशन्स चे प्रशिक्षण पूर्ण केले.ऑफ शोअर म्हणजे किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात वसलेल्या तेल किंवा इंधन क्षेत्रावरून हेलिकॉप्टर चालविणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असते पुरुष वैमानिकांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात तिने कारकीर्द करण्याचा निर्धार केला त्यासाठी तिने अमेरिकेतून पाम बीच हेलिकॉप्टर चे प्रशिक्षण घेतले. मयुरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याप्रसंगीत ती सांगते की आॕफ शोअर पायलट क्षेत्रात युवतींना करिअरच्या मोठ्या संधी आहेत मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने या क्षेत्रात तरुणींचे प्रमाण कमी आहे देशात प्रशिक्षण केंद्र उभारल्यास अनेक तरुणींना या क्षेत्रातील करिअरच्या संधी खुणावतील तसेच आकांक्षा पिंगळे हिला 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा झाली. त्यात सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून सुमी या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी पुरस्कार जाहीर झाला तिचाही यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी सौ. उमाताई खापरे प्रथम महिला आमदार पिंपरी चिंचवड तसेच मा.योगेश बहल मा महापौर मा.सदाशिव खाडे मा. नंदू कदम मा. राजन लाखे मा.किरण शेठ सुवर्णा मा. पोलीस निरीक्षक शंकर अवताडे साहेब पिंपरी पोलीस स्टेशन मा. जाधव साहेब पी आय क्राईम पिंपरी पोलीस स्टेशन व अभ्यासिकेतील एमपीएससी यूपीएससीचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले मा.नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले तरआभार मा.प्रदीप बोरसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ. वर्षा बोरसे व अभ्याशिखेतील विद्यार्थ्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
