*मावळ तालुका वारकरी भूषण वै.बाबुराव महाराज ठाकर यांच्या सहाव्या वर्षश्रद्धानिमित्त कुसवली येथील निराधारांचा आसरा आसणारे सहारा आश्रमात किराणा धान्य वाटप करण्यात आले.
मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष नरहरी केदारी रोहिदास महाराज धनवे मावळ तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती अध्यक्ष नारायण ठाकर मावळ तालुका राष्टवादी काँग्रेस युवक अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्या हस्ते धान्य वाटप झाले.
यावेळी ह भ प बाबाजी महाराज काटकर यांचे प्रवचन सेवा झाली वै.बाबूराव महाराज ठाकर यांचे वारकरी संप्रदायात फार मोठे योगदान होते .वर्ष श्रद्धांचे कार्यक्रमातुन मातापिता सेवाभावा वाढीस मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमास सहरा आश्रम संचालक विजय जगताप अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सूखदेव ठाकर ,उद्योजक नारायण मालपोटे ,पै निवृत्ती ठाकर ,सरपंच दत्तात्रय पडवळ शांताराम लष्करी ,बाळासाहेब दाते ,जि प गट अध्यक्ष दिगांबर आगिवले ,बजरंग तांबोळी ,पांडुरंग वारिंगे ,मुकुंद खांडभोर ,दत्तात्रय मालपोटे ,राजु खांडभोर ,धोंडीबा मोरे ,विकास खांडभोर, धर्मा तिकोणे गणेश जांभळे ,बबन जांभळे ,जनार्दन ठाकर ,ज्ञानेश्वर ठाकर ,दिगांबर कुडे दत्ता शिंदे ,गणेश खांडभोर व ग्रामस्थ आदी मंडळी उपस्थित होती.