संत तुकाराम नगर येथील तुकाराम महाराज मंदिरा समोरील लहुजी शक्ती सेनेने उभारलेल्या ग्रंथालयाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे हे होते .
युवानेते वीरेंद्र बहल ,लेखिका डॉ . उज्वला हातागळे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष डी .पी. खंडाळे आदी यावेळी उपस्थित होते . या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक खुडे आपल्या भाषणात म्हणाले ,ग्रंथालय हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक मानले जाते . समाजातील तरुण मोबाईल व टी . व्ही . मध्ये अडकलेले दिसत आहे त्यांना वाचनाची गोडी निर्माण करणे हे समाजातील लोकांचे प्रमुख कार्य असेल पाहिजे . समाजाची बौद्धिक भूक भागवण्यासाठी ग्रंथाल्यासारखे दुसरे साधन नाही. अध्यक्ष स्थानावरून बोलताना अँड रानवडे म्हणाले की, देशा मध्ये प्रथमतः अनेक क्रांतिकारक निर्माण करणारे लहुजी वस्ताद व जागतिक महासत्ता ज्यांच्या विचाराने व लेखनाने प्रभावित झाले त्या रशियन महासत्तेने आदरपूर्वक अण्णाभाउंना रशियात निमंत्रित केले.
सदरच्या कार्यक्रम जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सप्ताहाचे औचत्य साधून आज करण्यात आला .
सदरच्या कार्यक्रमास डी .एस.एस. चे अध्यक्ष सोपानराव चव्हाण , पंचशील संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड हे दोघांनी मनोगत व्यक्त केले . श्री. अनिल गायकवाड, शिवाजीराव साळवे , राजूशेठ चव्हाण , आर .जी. गायकवाड , राजरत्न शिलवंत आदीं मान्यवर उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रम घडवून आण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुधीर कांबळे , लक्ष्मी लोढम, आशा वरे , ओव्हाळ ताई , सुधीर कांबळे , स्वप्नील नेटके , गणेश वैरागड , स्वप्नील साळवे व उद्योजक संतोष इंगळे , अजय वायदंडे , अनिल आव्हाड यांनी काम केले .
प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजन लहुजी सेनेचे पिं .चिं . शहर अध्यक्ष श्री. राजूभाऊ आवळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष नेटके यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. दादाभाऊ आल्हाट यांनी केले.