आज आपण ज्या जगात वावरतोय तिथं बाह्यसौंदर्याला फार महत्त्व दिलं जात असून अधिकाधिक मुलींनी ब्युटी क्षेत्रात उतरल्यास करीयरला खुप संधी असल्याची भावना श्रेया ॲकॅडमीच्या संचालिका जयश्री धनगर यांनी आज येथे व्यक्त केली.
काळेवाडी येथील श्रेया ॲकॅडमीच्या वतीने गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने कोर्स पूर्ण केलेल्या मुलींना सर्टिफिकेट वाटप कार्यकमात त्या बोलत होत्या.या वेळी संकल्प एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका चेतनाताई बिडवे,आनिव्हिया कंपनीच्या सविताताई पाटील, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंढे,माजी नगरसेविका ज्योती भारती, उद्योजक कुंडलिक धनगर आदी उपस्थित होते.
वैयक्तिक आयुष्यात असो किंवा व्यावसायिक आयुष्यात असो; बाहेरच्या दिखाव्याला जग भूलतं. काळाची गरज असो किंवा स्वत:ला वाटतं म्हणून आज प्रत्येक जण सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. चारचौघात उठून दिसणं, चांगलं आणि टापटीप राहणं, आकर्षकरित्या स्वत:ला सादर करणं (प्रेझेंटेबल राहणं) आणि आपले शारीरिक रुप खुलवणं ही आज प्रत्येक स्त्री-पुरुषाची गरज बनली आहे. स्त्री-पुरुषांच्या सौंदर्याबद्दलच्या जागरुकतेचा परिणाम म्हणजे सौंदर्य क्षेत्राला (ब्युटी इंडस्ट्री) असणारी मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे असे त्यांनी नमूद केले.
तर ,कालच्या पार्लरची जागा आज ‘सलोन’ आणि ‘स्पा’नं घेतली आहे, तर ‘मेकअप’ ही संज्ञा आज मागे पडली असून ‘ब्युटी थेरपिस्ट’ ही तज्ज्ञ शाखा आज अस्तित्वात आली आहे. गेल्या काही वर्षांत सौंदर्य क्षेत्राचा चेहरामोहराच साफ बदलून गेला आहे, अर्थात या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले पाहायला मिळतात अशी माहिती विद्या खोत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
यावेळी निर्मल गरड, किर्ती जाबरे या मुलींना कोर्स पूर्ण केल्याबद्दल सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांचे आभार व्यक्त करताना ॲकॅडमीच्या संचालिका जयश्री धनगर म्हणाल्या की, श्रेया ॲकॅडमीत प्रशिक्षण घेऊन आज सुमारे दोनशेपेक्षा अधिक मुली व महिला या व्यवसायात खंबीरपणे कार्यरत असून आज आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्या माझ्या मार्गदर्शक असून त्यांच्या पाठबळावर व माझे पती कुंडलिक धनगर यांच्या खंबीर साथीमुळे आमची संस्था यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
समाज प्रबोधनकार शारदाताई मुंढे यांनी ,मुलींना मनोबल कसे वाढवावे व प्रचंड स्पर्धेत मुलींनी कसे यशस्वी व्हावे याबाबत मार्गदर्शन केले.
वैष्णवी यांनी सूत्रसंचालन केले तर राजश्री यांनी आभार मानले.