आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षि शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये राज्याच्या एकूण उत्पन्नातील ५३ टक्के रक्कमेची तरतूद शिक्षणासाठी करून आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शङर जिल्हा अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी आज येथे केले.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, लहुजी वस्ताद प्रतिष्ठान व साहित्यरत्न अण्णाभाऊसाठे संघ यांच्यावतीने आज राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाहूनगर येथील राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते अशोक सातपुते, प्रवीण कदम, सचिन दाभाडे, राजू आवळे, सुधीर कांबळे, स्मिता म्हस्कर आदी उपस्थित होते.