जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंदर मावळातील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमात वृक्षारोपण करण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे प्रबोधनकार शारदाताई मुंडे, उद्योजक राजन नायर आदी मान्यवरांच्या हस्ते पिंपळ, वड, आवळा,कडूनिंब या रोपांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी सहारा वृध्दाश्रमाचे प्रमुख विजय जगताप , तृप्ती वाघमारे, रामेश्वर राऊत उपस्थित होते.