पिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरातील सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या पथारी व्यवसायिक , टपरी धारक , छोटी – मोठी दुकाने , आदी छोट्या – मोठ्या व्यवसायिकांच्या कोविड टेस्ट करून त्यांचे शक्तीने व तातडीने लसीकरण करून घ्यावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अँड लक्ष्मण रानवडे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे यांच्या कडे मागणी केली आहे .
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने पिंपरी चिंचवड शहराला असंख्य अनुभव व पुढील दिशा ठरविण्याचे अनेक मार्ग प्रशासकीय व्यवस्थेला उपलब्ध करून दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आलेली आहे. या पाशर्वभूमीवर महापालिकेने विविध छोटे – मोठे कोवीड सेन्टर बंद करण्यास निर्णय घेण्यास सुरुवातही केलेली आहे.
मात्र आता कोरोना संपला किंवा लाट संपली म्हणून वैद्यकीय विभागाने सुटकारा सोडून आपली गती मंद करता कामा नये . रुग्णसंख्येचा ताणातून मुक्त झाल्याने न समजता तातडीने आता महापालिकेने सुपरस्प्रेडर असलेला शहरातील सर्व छोटया – मोठ्या व्यावसायिकांच्या अँटीजेन चाचणी व्यापक मोहीम हाती घ्यावी . त्याचे कारण म्हणजे गेली दोन महिने निर्बंधामुळे बंद असलेल्या सर्व व्यावसायिकांना आपले व्यापार क्षेत्र वाढविण्यास सुरुवात केली आहे व मागील दोन दिवसांपासून लोकांची गर्दीही शहरातील व बाजारपेठेत सर्वत्र वाढली आहे .
मागील महिन्याच्या संभाव्य कोरोनाची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन पिंपरी पोलीस चौकीने स्वतः हून आपल्या हद्दीतील भाजी विक्रेत्यांचा अँटीजेन चाचणी घेतली होती . तसेच पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करून कोरोना ग्रस्त नागरिकांना हॉस्पिटल कडे धाडले हि पोलिसांनी पुढाकार घेऊन केलेल्या उत्तम कामगिरी चा बोध घ्यावा . तरी आता आलेल्या अनुभवाचा धर्तीवर सर्व व्यावसायिकांची चाचणी व त्यांचे ताबडतोब लसीकरण करण्याच्या धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा व संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेशी मुकाबला करण्यास सुरुवात करावी . तसेच शहरातील वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या संस्थानी आपापल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेतल्यास शहरवासीयांचे लसीकरण करण्याचा मोठ्या तळाचा अडथळ दार होईल व यासाठी महापालिकेने सक्तीचे आदेश यांना काढावे .
या दोन्ही बाबी कोरोनाचा फैलाव रोखाने व लसीकरण करून शहरवासी निशचित राहणे याची दिशादर्शक मापदंड आहेत . अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अँड लक्ष्मण रानवडे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे यांच्या कडे मागणी केली आहे.