महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या आदेशा नुसार
‘ चला करू एक गाव कोरोना मुक्त ‘ ही मोहिम येत्या शनिवारी( ता २९) पिंपरीत सुरू होत आहे.
या उपक्रमानुसार पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस च्या वतीने
शनिवार दि 29मे व
रविवार दि 30मे
रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ‘श्री वरद क्लिनिक अँड डे केअर ‘ गणपती मंदिर समोर, तपोवन रोड पिंपरी गाव येथे पिं चिं मनपा च्या
जिजामाता हॉस्पिटल यांच्या सहकार्य ने नागरिकांची ‘रॅपिड अँटीजन टेस्ट* ‘ करण्यात येणार आहे.
कार्यक्रम चे उदघाटन कोरोना काळात अनेक रुग्णाचे समुपदेशनकार सामाजिक कार्यकर्त्यां प्रबोधनकार श्रीमती शारदाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माजी अध्यक्षा श्रीमती शामलाताई सोनावणे, नेत्या निगार ताई बारस्कर, बिंदू ताई तिवारी यांच्या उपस्थिती मध्ये उपक्रमाची सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरिजा कुदळे यांनी दिली.